प्रिया दत्त पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Related image

मंगळवारी काँग्रेसच्या २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यात प्रिया दत्त यांचं नाव जाहीर करण्यात आलंय. लोकसभा निडवणूक २०१९ साठी काँग्रेसनं ‘उत्तर मध्य मुंबई’ मतदार संघातून काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांना पुन्हा एकदा संधी दिलीय. ‘हो, मी ही निवडणूक लढणार आहे… माझ्या मुलांच्या भवितव्यासाठी मी निवडणूक लढतेय… लोकशाही वाचवण्यासाठी मी ही निवडणूक लढतेय’ असं प्रिया दत्त यांनी म्हटलंय.

या यादीत महाराष्ट्रातल्या पाच उमेदवारांचा समावेश आहे तर उत्तर प्रदेशातल्या १६ उमेदवारांचं नाव आहे. यामध्ये, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त यांना तर दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरांना तिकीट देण्यात आलंय. नागपूरमधून नितीन गडकरी यांच्या विरोधात नाना पटोलेंना मैदनात उतरवलंय, सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, गडचिरोलीतून नामदेव उसेंडी यांना उमेदवारी देण्यात आलीय. उत्तर प्रदेशात मोरादाबादमधून राज बब्बर यांना तर कानपूरमधून माजी केंद्रीयमंत्री श्रीप्रकाश जैस्वाल यांना उमेदवारी दिलीय. भाजपातून बंडखोरी केलेल्या खासदार सावित्री फुले यांनाही काँग्रेसनं उमेदवारी दिलीय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत