प्लास्टिक बंदीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तयार केली १५ हजार प्लास्टिकच्या बेकार बॉटल्सपासून एक रंगीत भिंत

मसूरी : रायगड माझा वृत्त 

आजच्या काळात प्लास्टिकचा वापर खूप वाढला आहे. पण त्यामुळे पर्यावरणाचं मोठे नुकसान होत आहे.प्लास्टिकवर बंदी आहे पण तरी देखील प्लास्टिकचा वापर काही बंद झालेला नाही. लोकांमध्ये अजूनही प्लास्टिक बंदीबाबत जागरूकता करण्याची गरज आहे.

उत्तराखंडच्या मसूरीमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जागरूकता करण्यासाठी एक चांगली संकल्पना समोर आणली गेली.मसूरीच्या बंग्लोतील कांडी गावात १५ हजार प्लास्टिकच्या बेकार बॉटल्सपासून एक रंगीत भिंत तयार करण्यात आली आहे.या भिंतीला ‘वॉल ऑफ होप’ म्हणजेच आशेची भिंत असं नाव देण्यात आलं आहे.ही भिंत १५०० फूट लांब आणि १२ फूट उंच आहे.

या भिंतीचं डिझाइन सुबोध केरकरने तयार केलं आहे.त्यांनी सांगितले की, गाव, शहरांना आम्ही प्लास्टिक मुक्त करण्यासाठी काम करत आहोत. ही भिंत तयार करून आम्हाला जनतेला संदेश द्यायचा आहे की, प्लास्टिकचा वापर कमी करा.अशा प्रकारे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी हि कलाकृती साकारली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत