बँकेत खाते उघडण्यासाठी व मोबाइलची नवी जोडणी घेण्यासाठी आता आधारकार्ड ऐच्छिक-केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त

बँकेत खाते उघडण्यासाठी किंवा नवीन मोबाइल जोडणी घेण्यासाठी आधार कार्ड ऐच्छिक करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या विधेयकाला संसदेत मान्यता मिळाल्यास कोणत्याही व्यक्तीला आपली ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड देण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधेयकाचा मसुदा संमत करण्यात आला. मसुद्यात नमूद प्रस्तावाचे उल्लंघन करणाऱ्याला मोठा दंड ठोठावण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ‘भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरण’ अर्थात ‘यूआयडीएआय’ला नागरिकांच्या हितार्थ एक बळकट प्रणाली तयार करण्यासाठी मदत होणार असून, ‘आधार’चा गैरवापर कमी होण्याची शक्यता आहे. प्रस्तावात नमूद केल्यानुसार नागरिकांना बँकेत खाते उघडण्यासाठी आधार कार्डचा वापर करता येईल, मात्र बँकांना आधार क्रमांक देणे बंधनकारक नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. टेलिग्राफ अधिनियम १८८५च्या अधिनियम २००२नुसार आधार कार्ड बँकांकडून ‘केवायसी’ची पूर्तता करण्यासाठी स्वीकारले जाऊ शकते. याचा अर्थ बँकेत खाते उघडण्यासाठी किंवा मोबाइलची नवी जोडणी घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर ऐच्छिक करण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत