बहिणीची देखभाल करण्यासाठी अलेल्या महिलेवर बलात्कार

मुंबई : रायगड माझा वृत्त

सायन रुग्णालयात नेहमीच रुग्णांची मोठया प्रमाणावर वर्दळ असते. महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक येथे 24 तास तैनात असतात. तरीदेखील या रुग्णालयात बलात्काराची घटना घडल्यामुळे पोलीस चक्रावून गेले आहेत.पीडित महिलेची बहीण रुग्णालयात उपचार घेत आहे. बहिणीची देखभाल करण्यासाठी सदर महिला रुग्णालयात आली होती. आरोपी नियमित रुग्णालयात येत होता.

मुंबईतील रुग्णालयसुद्धा महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात एका 37 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सायन पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

शुल्कामध्ये सवलत देणारा फॉर्म भरण्याच्या बहाण्याने आरोपी पीडित महिलेला रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावर निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत