बाबासाहेबांनी लिहिलेली देशाची राज्यघटना ही सर्व जनतेसाठी सर्वात मोठी देणगी

खासदार बारणे यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

पिंपरी : रायगड माझा वृत्त
आज (रविवारी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांचे विचार जनमानसात पोहोचविण्यासाठी अनेक कार्यक्रम आणि उपक्रम राबविले जात आहेत. शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती निमित्त बारणे यांनी अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली देशाची राज्यघटना ही सर्व जनतेसाठी सर्वात मोठी देणगी आहे. त्यांचे विचार सर्वत्र आणखी सक्रियपणे पसरविण्याची गरज आहे, असे यावेळी बारणे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, हरेश नखाते, प्रदीप दळवी, प्रमोद ताम्हणकर, तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांशी खासदार बारणे यांनी चर्चा केली. आंबेडकर यांनी जनतेला दिलेला मतदानाचा अधिकार सर्वांनी बजावला पाहिजे, असे आवाहन देखील बारणे यांनी केले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत