बोरघाटात मिनीबसचा अपघात; रेडिअटर मधील पाणी अंगावर पडल्याने सात जण भाजले

समाधान दिसले: खोपोली

बोरघाटात अपघाताची मालिका सुरूच आहे. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मिनी बसचा ब्रेकफेल झाल्याने अपघात झाला आहे. अपघात झाल्याने ही बस पलटी होवून बसच्या रेडिअटरचे पाणी प्रवाशांच्या अंगावर पडले आहे. या मध्ये सात जण भाजले आहेत.

आयुर्वेदिक आणि जडीबुटीची औषधांची विक्री करणारी मिनीबस पुण्यावरून मुंबईकडे जात होती. हि बस बोरघाटात आल्यानंतर तिचा ब्रेक फेल झाला आणि ती २० फुट खोल कोसळली. ही बस खाली कोसळल्यानंतर बसच्या रेडीएटरचा स्फोट झाला आणि त्याचे गरम पाणी बसमध्ये असलेल्या सात जणाच्या अंगावर पडले. हे गरम पाणी अंगावर पडल्यानंतर यातील सात जण भाजले आहेत. यामध्ये पाच पुरुष तर दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस आणि अपघातग्रस्त टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बस मधील भाजलेल्या व्यक्तींना बसमधून बाहेर काढले. आणि त्यांना तात्काळ खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात तर काहींना मुबंई येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. यामध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत