भागीदारी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंची भाजपाला साथ, छगन भुजबळ यांचा घणाघात

 

बुलढाणा : नितीन कानडजे पाटील

उद्धव ठाकरे तुम्ही तुमची जबाबदारी झटकू नका,हे सरकार निर्लज्ज असल्याचे तुम्ही म्हणाले होते, आणि त्याच सरकारसोबत तुम्ही पुन्हा बसला आहात. पहारेकरी चोर असल्याची तुमची वल्गना कुठे गेली असा सवाल विचारात तुम्ही पुन्हा भागीदारी घ्यायला बसले का असा घणाघात छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

बुलढाण्याचे राष्ट्रवादीचे उमेदवर राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची प्रचार सभा आयोजित केली होती त्यासभेत त्यांनी शिवसेनेवर आपला निशाणा साधलाय.

स्वतःला देशाचे चौकीदार म्हणवून घेणारे तुम्ही मग राफेलची कागदपत्रे तुमच्याकडून चोरीला गेलीच कशी असा सवाल छगन भुजबळ यांनी भाजपला विचारलाय. दिल्लीत महाराष्ट्राचं शान राखणारं सदन आम्ही बनवलं त्याची नरेंद्र मोदींनी सुद्धा प्रशंसा केली. मात्र महाराष्ट्र सदन बनवणाऱ्याला तुरुंगात टाकल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

दरम्यान छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेले उद्धव ठाकरे हे सरकारमध्ये असून देखील सरकारवर टीका करत सुटले होते. निर्लज्ज सरकार असल्याचे सांगून पहारेकरी चोर असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली होती. आता ती टीका कुठे गेली असा सवाल करत उद्धव ठाकरे पुन्हा भागीदारी घेण्यासाठी युतीत सामील झाल्याची टीका भुजबळ यांनी आपल्या भाषांत केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत