भाजप आमदार मंदा म्हात्रेंवर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल

नवी मुंबई: रायगड माझा वृत्त

माथाडी वर्गाला दोनदा मतदान करण्याचे आवाहन करून खळबळ उडवून देणाऱ्या भाजपच्या बेलापूरमधील आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप असून, त्यांच्यावर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरखैरणे सेक्टर ५ मध्ये युतीच्या माध्यमातून रविवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली होती. हे दोन्ही उमेदवार शिवेसेनेतर्फे निवडणूक लढवत आहेत. नोकरी, धंद्यानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातून नवी मुंबईत स्थलांतरित झालेला माथाडी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. रविवारी कोपरखैरणे येथे शिवसेना उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत आमदार मंदा म्हात्रे यांनी, नवी मुंबईत राहणाऱ्या माथाडी वर्गाने सातारा येथे जाऊन शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांना २३ एप्रिल रोजी मतदान करावे, आणि २९ एप्रिल रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना मतदान करावे, असे विधान केले. म्हात्रे यांच्या या विधानावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत