भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

अकोला : रायगड माझा वृत्त 

भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा

राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांत तिसरा राजकीय पर्याय असणारं ‘भारिप-बहूजन महासंघ’ हे नाव आता इतिहासजमा होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ‘भारिप-बहूजन महासंघ’ आंबेडकरांच्या नेत्रूत्वात तयार झालेल्या ‘वंचित बहूजन आघाडी’त विसर्जित करणार असल्याचं आज प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. अकोल्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. पक्ष विसर्जित करण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीनंतर सुरु करणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

प्रकाश आंबेडकरांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणातल्या रिपब्लिकन चळवळीतील ‘भारिप-बहूजन महासंघ’ नावाचं ‘पर्व’ संपणार आहे. आंबेडकरांनी या निर्णयातून आपल्या राजकीय कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न केला आहे. ‘रिपब्लीकन’ नावातून एकाच समाजाचं नेत्रूत्व करण्यापेक्षा ‘बहूजन’ नावाने सर्वांना सोबत घेण्याच्या दृष्टीने आंबेडकरांनी हा निर्णय घेतला असावा. त्यामूळे ‘वंचित बहूजन आघाडी’ ही प्रकाश आंबेडकरांची नवी राजकीय ओळख त्यांना खरंच राजकीय ताकद देणारी ठरेल का याचं उत्तर येणारा काळच देईल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत