भावाच्या ट्विटनंतर तरुणीच्या मदतीला रेल्वेमंत्र्यांनी पाठवले पोलीस

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for piyush goyal

ट्रेनमध्ये एका तरुणीची छेड काढणं काही तरुणांना चांगलंच महागात पडलं. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एक ट्विट केलं आणि रेल्वे पोलिसांनी धाव घेतली. विशाखापट्टनम येथून दिल्लीला जाणारी 22415 सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये एक तरुणी भोपाळवरुन बसली. या दरम्यान ट्रेनच्या 3 एसी कोचमध्ये ५ ते ६ युवक चढले. ते नशेमध्ये होते अशी माहिती देखील मिळाली आहे. त्यानंतर त्यांनी तरुणीची छेड काढली. या दरम्यान तरुणीच्या भावाने रेल्वेमंत्र्यांना ट्विट करत म्हटलं की, ‘सर तुमच्या मदतीची गरज आहे. माझी बहिण ट्रेन नंबर 22415 मध्ये प्रवास करत आहे. तिच्या कोचमध्ये ६ लोकं ड्रिंक करुन चढले आहेत आणि तिची छेड काढत आहेत. मी रांचीमध्ये आहे आणि हेल्पलेस आहे. कृपया माझी मदत करा.’

भावाने केलेल्या या ट्विट नंतर लगेचच रेल्वेमंत्री कार्यालय हरकतीत आलं. या ट्विटनंतर रेल्वेमंत्री कार्यालयाने आग्रा एसपी जीआरपी पोलिसांना आदेश दिले. पोलिसांनी देखील युवकाला ट्विट करुन चिंता करु नका असं म्हटलं. तुमच्या मदतीसाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.

रेल मंत्री को ट्वीट, brother tweets rail minister, train no 22415, piyush goyal

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत