भ्रष्टाचाराच्या गर्तेत रुतलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराचा पर्दाफाश

अजय गायकवाड : दहागाव (कल्याण )

सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता.. प्रत्येकासाठी.. प्रत्येक ठिकाणी.. असे ध्येय ठेवून काम करण्याची आरोग्य विभागाची घोषणा किती फोल आहे याच प्रत्यय कल्याण तालुक्यातील दहागाव येथील प्राथमिक आरोयग्य केंद्राला भेट दिल्यानंतर येतोय . परिसरातील अनेकगावांसाठी महत्वाचे असलेले हे प्राथमिक आरोग्यकेंद्र सध्या भ्रष्टाचाराच्या आणि अनास्थेच्या दलदलीत रुतले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या आरोग्यकेंद्राच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी नागरिकांच्या अनेक तक्रारीनंतर रायगड माझाचे प्रतीनिधी अजय गायकवाड यांनी या आरोग्य केंद्रास प्रत्यक्ष भेट दिली.

दहागाव या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात, गेल्या वीस वर्षात एक हि पेशंट ऍडमिट झालेला नाही..हो…. हो…. एक रुग्ण अडमिंट झालेला नाही.. आश्चर्य वाटलं ना .. पण रुग्णाला उपचारासाठी दाखल करून घेण्याची व्यवस्था असली तरी डॉक्टरांची तशी मानसिकताच नाही .गेली वीस वर्ष हे प्राथमिक आरोग्य केंद्र अशा अनास्थेच्या झळा सहन करत आहे. परिसरातील अनेक गावातील आणि आदिवासी वाडीतील आदिवासी उपचारासाठी या प्राथमिक केंद्रावर अवलंबून आहेत. वांगणी येथील सामाजिक कार्यकर्ते असणारे शेळके व कडाव यांनी दहागाव येथील ग्रामस्थांच्या व्यथेला वाचा फोडली . ग्रामीण भागात आरोग्य सेवा सक्षमपणे पोहचवण्यासाठी कोट्यवधींचा निधी शासन खर्च करत असले तरी वास्तवतेत मात्र या प्राथमिक केंद्राची अवस्था फारशी चांगली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत अनेक तक्रारी वारंवार येत असतांनाही त्याकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नाही. जिल्हा परिषदेमार्फत सरकाराच्या योजनेमध्ये मातृत्व अनुदान, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, कुटुंब नियोजन नुकसान, माहेर घर योजना, यासारख्या ३० योजना आहे. पण, त्या रुग्णांपर्यंत पोहचवणारी यंत्रणा कुचकामी आहे. जागतिक संघटनने सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता.. प्रत्येकासाठी.. प्रत्येक ठिकाणी हे घोषवाक्य जाहीर करून ही सेवा सर्वांपर्यंत पोहचवण्याचे ध्येय ठेवले पण दहागाव सारखी प्राथमिक आरोग्य केंद्र याला अपवाद ठरतात . इथे कर्मचाऱ्यांमध्ये ताळमेळ नाही . एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून आपली जबादारी ढकलण्यात येथील कर्मचारी गुंग आहेत. येथील प्राथमिक आरोग्यसेवेसाठी आणलेल्या अनेक किमती वस्तू धूळ खात पडल्याचे दिसत आहे. हि खरेदी अनावश्यक असल्याचे येथील कर्मचाऱ्यांचेच म्हणणे आहे. तर टक्केवारीच्या उद्देशाने हि अनावश्यक खरेदी केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे .

इथे आलेल्या रुग्णांना उपचारासाठी कल्याण ,उल्हासनगर ,गोवेली येथील हॉस्पिटल मध्ये पाठविले जाते .यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची प्रचंड हेळसांड होते . सलाईन सारखा साधा उपचार देखील इथे होत नसल्याची तक्रार आहेत.

आरोग्य विभागाची ग्रामीण सेवा रडत खडत सुरू असल्याची बाब समोर आली आहे. केंद्रात प्रत्येकी दोन डॉक्टर कार्यरत असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात एकाच डॉक्टरकडे संपूर्ण केंद्राचा केंद्राचा पदभार आहे. रात्रीच्या वेळेस तर एकही डॉक्टर नसतो त्यामुळे ग्रामीण जनतेला आरोग्यसेवेसाठी अद्यापही झगडावे लागत आहे. सरकारचे दावे किती फोल आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दहागावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर ना सरकारचे नियंत्रण आहे ना ठाणे जिल्हापरिषदेचे . भ्रष्टाचार आणि अनास्था यामुळे दहागावचे प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर आले आहे. पण उपचारासाठी नागरिकांना सलाईन नाकारणाऱ्या या प्राथमिक आरोग्यकेंद्राचा कोण उपचार करणार हा खरा प्रश आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत