मंगळानंतर इस्त्रो करणार पृथ्वीचा जुळा भाऊ शुक्राची वारी

श्रीहरीकोटा : रायगड माझा वृत्त

मंगळ ग्रहावर अंतराळ यान पाठवल्यानंतर आता इस्रोने शुक्र ग्रहावर अंतराळ यान पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रोचे संशोधन यशस्वी झाल्यास २०२३मध्ये भारताचे अंतराळयान पहिल्यांदा शुक्र ग्रहावर उतरेल.

शुक्र ग्रहाला पृथ्वीचा जुळा भाऊ मानलं जातं. त्यामुळे शुक्र ग्रहाची अभ्यास मोहिम आखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्र आणि पृथ्वीमध्ये अनेक साम्य आहे. शुक्र ग्रहाची अभ्यास मोहीम या ग्रहाच्या विविध थरांचा, वातावरणाचा आणि सूर्याशी येणाऱ्या संबंधांचा अभ्यास करणार आहे. भारताच्या या मोहिमेबद्दल ऐकताच जगभरातील अनेक देशांची उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे जगभरातील २० देशांनी या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा दर्शवल्याची माहिती इस्रोचे संचालक के. सिवान यांनी दिली आहे.

येत्या काही वर्षांमध्ये इस्रोने अनेक अंतराळ मोहिमा फत्ते करण्याचा बेत आखला आहे. चांद्रयान-१ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर काही महिन्यांतच चांद्रयान-२चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याशिवाय सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल१’ हे अंतराळयान २०२१मध्ये सूर्याजवळ पाठवण्यात येईल. २०२२मध्ये मंगळयान-२ पाठवण्यात येईल. तर चांद्रयान-३चे प्रक्षेपण २०२४मध्ये करण्यात येईल. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघासमोर भारताच्या आगामी योजनांबद्दलची माहिती मांडणारे एक सादरीकरणही करण्यात आले आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत