मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल रेल्वे पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेच्या अप मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचे सांगितले जात आहे. टिटवाळा आणि आंबिवली या दोन स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. या दोन स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. महिन्याचा हा तिसरा शनिवार असल्याने अनेक चाकरमानी आपल्या कामावर आणि इतर ठिकाणी जात होते. या दरम्यान हा बिघाड झाल्यामुळे त्यांचे तसेच प्रवाशांचे हाल झाले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत