ममता बॅनर्जी यांचं वागणं हुकुमशहा सद्दाम हुसैन प्रमाणे : विवेक ओबेरॉय

दिल्ली : रायगड माझा वृत्त

कोलकात्यात भाजप पक्षाध्यक्ष अमित शहांच्या रोडशो दरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामाारी झाली. यानंतर भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना मध्यरात्री अटकही करण्यात आली. याआधी ममता बॅनर्जींचे प्रियांका गांधीच्या रुपातील मीम सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या प्रियांका शर्मा हिलाही अटक करून नंतर जामिनावर सोडून देण्यात आलं होतं. गेले काही दिवस बंगालमध्ये चालू असलेल्या राजकीय धुमश्चक्रीवर पहिल्यांदाच कोणत्यातरी कलाकाराने भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका वठवणाऱ्या विवेक ओबेरॉयने ट्विटरच्या माध्यमातून ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.

‘मला कळत नाही दीदींसारखे आदरणीय व्यक्तिमत्त्व सद्दाम हुसैनप्रमाणे का वागत आहे. खरं तर लोकशाही खतरे में है अशी मागणी करणाऱ्या ममता दीदींमुळेच लोकशाही धोक्यात आली आहे. आधी प्रियांका शर्मा आणि आता तजिंदर बग्गा. दीदींची ही दीदीगिरी चालणार नाही’.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हुकुमशहा सद्दाम हुसैनप्रमाणे वागत आहेत अशी टीका सुप्रसिद्ध अभिनेता विवेक ओबेरॉय याने कोलकात्यात काल झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर केली आहे, ममता दीदींची ही ‘दीदीगिरी’ जास्त दिवस चालणार नाही असा टोलाही विवेक ओबेरॉयने लगावला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत