महाराष्ट्र ट्रेकर्स ग्रुपने सर केला तेलबैलाचा सुळका

रायगड माझा वृत्त

महाराष्ट्रातील साहसीकडे अनेक गिर्यारोहकांना खुणावतात आहेत. असे सुळके सर करणे हे अनेकांचे स्वप्न असते. गिर्यारोहकांना आव्हानात्मक असलेला असाच तैलबैल सुळका. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी या अनोख्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील हा अवघड आणि आव्हानात्मक सुळका सर केलाय वैभव नाईक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी.

लोणावळ्यापासून 30 किलोमीटरवर तैल-बैल नावाचा सुळका आहे. रॉक-क्लाइम्बरसाठी हा सुळका म्हणजे जणू पंढरीच. कारण या सुळक्यावर जाण्यासाठी चार मार्ग आहेत. खडा सुळका सर करणं म्हणजे रोमांचकारी आणि तेवढाच थरारक अनुभव. तैल-बैल सुळका म्हणजे समुद्र सपाटीपासून अंदाजे 3300 फूट उंचीच्या दोन खड्या भिंती. दोन्ही सुळक्याच्या मध्ये भैरवनाथाचं प्राचीन मंदिर आहे, मंदिरात पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. सारं काही अदभुत . वैभव नाईक आणि त्याच्या अन्य गिर्यारोहक मित्रांनी हा सुळका सर केला आणि ड्रोणच्या सहाय्याने याचे चित्रकिरण देखील केले. एक मे या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र ट्रेकर्स या ग्रुपने हि कामगिरी केली आहे. रोहित हिवाळे , सुरज सुतार , निलेश माने वैभव येवले हे देखील या मोहिमेत सहभागी झाले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत