मानुषीला बॉलिवूडमध्ये नाही तर वैद्यकीय क्षेत्रातच करायचंय करिअर

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Image result for manushi chillar

मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर मानुषी छिल्लरदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली होती. इतकंच काय तर फराह खान आणि करण जोहर मानुषीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र मानुषीला बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचं नसून तिने करिअरसाठी वेगळ्या एका क्षेत्राची निवड केल्याचं समोर आलं आहे. या क्षेत्राविषयी मानुषीने एका मुलाखतीमध्ये सांगितल्याचं पाहायला मिळालं.

मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर माझ्यावरील जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. मात्र या जबाबदाऱ्या पार पाडताना मला माझ्या शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नव्हतं. माझ्याप्रमाणेच अशा अनेक मिस इंडिया, मिस वर्ल्ड आहेत ज्यांनी त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. वैद्यकीय शिक्षणातून तुम्हाला जीवनात बऱ्याच गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव येतो. त्यामुळेच मला माझं वैद्यकीय शिक्षण अपूर्ण सोडायचं नाही. मी काही काळ ब्रेक घेऊन माझ्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं आहे.” असे मानुषीने स्पष्ट केले आहे.  मुख्य म्हणजे मिस वर्ल्ड संस्थेच्या माध्यमातून जे काही करता येईल ते करायला आवडेल असेही यावेळी मानुषी हिने म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत