माफ करा, आम्ही तुमचे गुलाम नाहीत, पार्थ पवार यांच्या विरोधात फलकबाजी 

चिंचवड : रायगड माझा वृत्त

मतदारांनी आजोबांना मत दिली, पुतण्याला दिली. आता नातवाला पण…माफ करा आम्ही तुमचे गुलाम नाहीत..अशा प्रकारचे फलक चिंचवड परिसरात लागले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या विरोधात सजग नागरिकाने लावलेल्या या फलकाने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

दिवंगत शिक्षणमंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून परिचित होते. त्यावेळी पिंपरी चिंचवडमध्ये कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती, त्यामध्ये रामकृष्ण मोरे यांचे वर्चस्व होते. मात्र हे वर्चस्व उलथवून टाकत अजित पवार यांनी महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात घेतली. कालांतराने अजित पवार यांनी शहरातील कॉंग्रेस संपवून टाकली. त्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पवार यांच्यातली नाराजी सातत्याने दिसून आली आहे. त्याचाच आधार घेत एका सजग नागरिकाने पार्थ पवार यांच्या विरोधात फलक लावून पार्थ पवार यांना मतदान करून नका असे आवाहन केले आहे.

दिवंगत रामकृष्ण मोरे यांना श्रद्धांजली फक्त यांच्या पराभवाने मिळेल. कुटुंब कल्याणाला घरी पाठवा..गुलामी हटाव अशा प्रकारचे फलक एका सजग नागरिकाने चिंचवड परिसरात लावले आहेत. तसेच या सजग नागरिकाने पवार कुटुंबावरही आक्षेप नोंदवत मतदारांनी आजोबांना मत दिली, पुतण्याला दिली. आता नातवाला पण…माफ करा आम्ही तुमचे गुलाम नाहीत.अशा आशयाचे फलक सजग नागरिकाने लावले आहेत. या फलकाने चिंचवड शहरातील राजकीय वातावरण मात्र ढवळून निघाले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत