मुंबईत बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून एकाचा मृत्यू

मुंबई: रायगड माझा वृत्त

धारावीतील पीएमजीपी कॉलनीतील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याची घटना रविवारी रात्री १०.३०च्या सुमारास घडली आहे. या अपघातात शाहदाद अली अन्सारी या ३२ वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळं इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा पाइप रिक्षाचालकावर कोसळल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला तर, दोघे जखमी झाले. शामलाल जोहरालाल जायस्वाल (६०) व साजिद खान (३३) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत