मुंबई पादचारी पूल दुर्घटना: ही आहेत मृतांची नावे

मुंबई : रायगड माझा वृत्त

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सजवळील संध्याकाळी 7.30 च्या सुमारास पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत 4 जणंचा मृत्यू तर 34 जण जखमी झाले आहेत.

जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींवर सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि सायन रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यापैकी अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे या नर्स असून त्या रात्रपाळीसाठी जीटी रुग्णालयात जात होत्या.

मुंबई पालिका आणि रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार मृतांची नावे

– अपूर्वा प्रभू (वय 35 )

– रंजना तांबे (वय 40)

– झाहीद खान (32)

– सारीका कुलकर्णी (35)

– तपेंद्र सिंग (35)

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत