मुख्य विद्युत वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वे ठप्प

मुंबई : रायगड माझा वृत्त

टाटा कंपनीकडून वीज पुरवठा करणाऱ्या नेतीवली टेकडी जवळच्या मुख्य विद्युत वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने ओव्हरहेड वायरमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास हि घटना घडली. त्यामुळे कल्याण ते कर्जत, लोणावळा, आणि कल्याण ते कसारा, इगतपुरी दिशेकडील उपनगरीय आणि लांबपल्याची रेल्वे वाहतुक खोळंबली आहे. या घटने मुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.तांत्रिकी बिघाड झाल्याने हि समस्या निर्माण झाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. ए.के.सिंग यांनी दिली आहे. नेमका बिघाड काय झाला होता हे मात्र ते सांगू शकले नाहीत. त्या संदर्भात वरिष्ठांनी टाटा वीज वितरण विभागाच्या वरिष्ठांशी संपर्क साधला असून लवकरच वाहतूक सुरू होईल असे ते म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत