मुरूड येथे पिंकअप गाडी पलटी होवुन २१जण जखमी; सुदैवाने मोठा अपघात टळला

मुरुड (जंजिरा) : अमूलकुमार जैन

मुरूड तालुक्यातील महालोर गावातील २०ते२५ वयोगटातील मुले केळकर येथे किक्रेट खेळण्याकरिता पिंकअप गाडी एम एच ०६ बी जी २१४५या मधुन २१ते २५ मुले गेले होते. किक्रेट संपवुन पुन्हा महालोर गावी रात्री८वाजता परतेवेळी काही अंतरावर चढाव चढुन टन घेत आसताना गाडी चालकाचा टोल गेल्याने गाडी पलटी होवुन २१जण जखमी झाले.त्यामध्ये ६ जण अती गंभीर जखमी आहेत.

मुरूड- केळकर येथुन किक्रेट मॅच खेळुन एम एच ०६बी. जी. २१४५ पिंकअप या गाडीत आपल्या महालोर गावी निघाल्या असता महालोर चढावर चढत असताना चालक – इत्किप इकबाल दळवी हा चालत्या गाडीत मोबाईल वरुन बोलत असताना त्यात नव्याने रस्ताचे काम चालु असल्याने रस्त्यावर खडी असल्याकारणाने त्यावरून चालकाचा स्टेरीग वरचा ताबा सुटल्याने जाग्याच गाडी पलटी होवुन २१जण जखमी झाले तर त्यामधील६जण अती गंभीर जखमी झाल्याने चालक- इत्किप इकबाल दळवी घाबरून पाळुन गेला.

गंभीर जखमीची पुढील प्रमाणे काशीनाथ देवजी शिगवण, चंद्रकांत हरी पाटील, गोपाळ पांडुरंग लोढे, गणेश रामा शिगवण, निखील हरिश्चंद्र पाटील, अनिकेत गणपत अदावडे यांना पुढील उपचारकरिता अलिबाग येथील ग्रामीण रुग्णालय हलविण्यात आले आहे .तर बाकी मुरूड ग्रामीण रुग्णालय ठेवण्यात आले आहे.ते पुढील प्रमाणे ऋषिकेश सिताराम शिगवण, अनिकेत सुरेश पाटील, नागेश चंद्रकात पाटील, विठ्ठल हरिश्चंद्र धनावडे, अनिकेत रामचंद्र पानगळे, प्रदिप दगडू अदावडे, साईनाथ लक्ष्मण डिके, श्रेयस राजेश धनावडे, रोहन नरेश भुवड, दिपक सुरेश मोहिते, शशिकांत सखाराम धनावडे, विराज विठ्ठल धनावडे, सुदेश सुरेश अदावडे, प्रविण दगडू नलावडे यांना मुरूड ग्रामीण रुग्णालय ठेवण्यात आले आहे.

सद्या म्हालोर रस्त्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत काम सुरू आहे लवकरच हा रस्ता नवीन स्वरूपात बनणार आहे काही वर्षांपूर्वी महलोर गावात लग्नाचे व्हराड घेऊन मुरुड कडे येत असताना ट्रक चालकाचा एका अवघड वळणावर ताबा सुटल्याने ट्रक खोल दरीत कोसळला होता यामध्ये काही जणांच्या त्यावेळी मूर्त्यु सुद्धा झाला होता सदरचा येथील रस्ता डोंगराळ भागातील व खोल दरी असल्याने वाहन खूप काळजी पूर्वक चालवावे लागते।यासाठी वाहन चालक दक्ष असणे खूप आवश्यक आहे

चालक इत्किप इकबाल दळवी यांच्या वर मोटार वाहन कायद्यानुसार कलम २७९ , ३३७ , ३३८ व १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विश्वनाथ पाटील करित आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत