‘मैं भी चौकीदार’; भाजपचा नवा प्रचार फंडा

 

नवी दिल्ली: रायगड माझा वृत्त

‘चौकीदार चोर हैं’ या तीन शब्दांच्या आधारे काँग्रेसने गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपच्या नाकीनऊ आणले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही कंबर कसली आणि ‘चौकीदार चौर हैं’ ला प्रत्युत्तर म्हणून ‘मैं भी चौकीदार’ अशी मोहीम सुरू केली आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या मोहिमेला आपल्या ट्विटर अकाउंटवरून सुरुवात करून दिली.

‘तुमचा चौकीदार इथे उभा आहे आणि देशाची सेवा करतोय. पण, मी एकटा नाही. भ्रष्टाचार, अस्वच्छता, सामाजिक तेढ याविरोधात लढणारा देशातला प्रत्येक जण चौकीदार आहे. भारताच्या प्रगतीसाठी मेहनत करणारा प्रत्येकजण चौकीदार आहे. आज प्रत्येक भारतीय म्हणतोय – मी पण चौकीदार’ असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

या मोहिमेसाठी ‘हा, मैं भी चौकीदार हूँ’ हे गाणंही तयार करण्यात आलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत