मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन महिलांचा वाहनाच्या जोरदार धडकीने जागीच मृत्यू

जुन्नर : रायगड माझा वृत्त

नगर-कल्याण महामार्गावरील उदापूर येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन महिलांना अज्ञात वाहनांनी जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.अहमदनगरमध्ये मॉर्निंग वॉकला जाणं तीन वृद्ध महिलांना महागात पडलं आहे.

आज पहाटे ६ वाजता हा भीषण अपघात झाला. नगर-कल्याण महामार्गावरील उदापूर येथे मीराबाई ढमाले, कमलाबाई महादू ढमाले आणि सगुणाबाई बबन गायकर या नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने या तिन्ही महिलांना जोरदार धडक दिली. त्यात या तिघी जागीच ठार झाल्या. या अपघातानंतर चालक फरार झाला आहे. या अपघाताप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत