मोदींची प्रज्ञाच्या विधानावर नाराजी

भोपाल : रायगड माझा वृत्त

महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हणवणारी भाजप उमेदवार साध्वी चांगलीच अडचणीत आली आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले, ‘गांधीजींबाबत जी विधानं बोलली जात आहेत ती वाईट, घृणास्पद आहेत. सभ्य भाषेत अशी वक्तव्यं केली जात नाहीत. असं बोलणाऱ्याला १०० वेळा विचार करावा लागेल. त्यांनी माफी मागितली असेल तरी मी मनापासून त्यांना कधीही माफ करणार नाही.’ अशा तीव्र शब्दात मोदींनी प्रज्ञावर नाराजी व्यक्त केली आहे.

आता पक्षाच्या या डॅमेज कंट्रोलसाठी खुद्द आता खुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसावले आहेत. ‘प्रज्ञा यांनी भलेही माफी मागितली असेल, पण मी मनापासून त्यांना कधीही माफ करणार नाही,’

तत्पूर्वी, भाजपने नथुराम गोडसेंबाबत वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा, नलीन काटील आणि अनंतकुमार हेगडेंची निवेदने पक्षाच्या अनुशासन समितीकडे पाठवली आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत