मोदींसमोरच आत्महत्या करण्याचा भाजप उमेदवाराचा इशारा

 

शिलाँग: रायगड माझा वृत्त

घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी नागरिकत्व (सुधारणा) विधेयक लागू करण्याचे आश्वासन देत भाजप लोकसभा निवडणूक लढवत आहे, तर दुसरीकडे याच विधेयकाला भाजपच्या एका उमेदवारानं विरोध दर्शवला आहे. हे विधेयक लागू केलं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोरच आत्महत्या करेन, असा इशारा त्यानं दिला आहे.

मेघालयातील शिलाँग लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सनबोर शुल्लाई यांनी गुरुवारी नागरिकत्व (सुधारणा) विधेयकाला विरोध केला. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत या विधेयकाला विरोध असेल. त्यासाठी मी जीव सुद्धा देईल. नरेंद्र मोदींच्या समोरच आत्महत्या करेन, असं शुल्लाई म्हणाले.

घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी नागरिकत्व (सुधारणा) विधेयक लागू करणार असल्याचं आश्वासन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी दिले. ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणे घुसखोरांचा ‘व्होटबँके’साठी वापर करणार नाही. राष्ट्रीय सुरक्षेला आमचं प्राधान्य आहे, असं ते म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत