मोबाइल गेम कमाईत पबजीची बाजी

मुंबई : रायगड माझा वृत्त

तरुणाईला वेड लावणारी पबजी गेम आता आणखी एका गोष्टीने चर्चेत आहे. मोबाइल गेमिंग विश्वात खळबळ माजवणाऱ्या पबजी गेमने कमाईतही बाजी मारली आहे. इतर मोबाइल गेमपेक्षा पबजीने सर्वाधिक कमाई केली आहे. चीनसोडून इतर देशांमध्ये पबजीचे दररोज ५ कोटी अॅक्टीव्ह युजर्स आहेत. तर, ४० कोटींपेक्षा जास्त वेळा हा गेम डाउनलोड करण्यात आला आहे. एका रिपोर्टनुसार, पबजीने मागील महिन्यात १४६ मिलियन डॉलरची कमाई केली आहे.

मागील वर्षी पबजी मोबाइल गेमने ७०० मिलियन डॉलरची कमाई केली होती. अनेक मोबाइल इन-गेम पर्चेस असतात. इन-गेम लूकसाठी स्कीन आणि वेशभूषेसाठी खर्च करतात. पबजीने आपले युजर्स टिकवण्यासाठी आणि गेममध्ये नाविन्य आणण्यासाठी नवीन अपडेट्स आणले आहेत. त्यानुसार आता २२ जून रोजी गेमचा नवीन व्हर्जन सॅनहॉक लाँच होणार आहे. त्याशिवाय पबजी स्नो थीम मॅप आणण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. बुधवारी, टेनसेंट गेमने टीम डेथमॅच गेमप्ले लाँच केला. या अपडेटमध्ये पबजीने पहिल्यांदा फास्ट-पेस्ट फायरफाइट्स आणि काही इन-गेम एडिशनसाठी ४v४ बॅटल मोड आणले आहे. या अपडेटमुळे अन्य खेळाडूंसोबत काम करणे, संवाद साधणे सोपे होणार आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत