…..म्हणून शाहरुख-अक्षय एकत्र काम करणार नाहीत

मुंबई: रायगड माझा वृत्त

अभिनेता शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांचा चाहतावर्ग प्रचंड आहे. या दोन्ही कलाकारांनी चित्रपटात एकत्र काम करावं अशी अनेक चाहत्यांची इच्छा आहे. परंतु, चाहत्यांची ही इच्छा इतक्यात पूर्ण होणार नाही असं दिसतंय. बॉलिवूडच्या किंग खाननं खिलाडी कुमारसोबत काम करणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

शाहरुख खानला नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान ‘अक्षयसोबत चित्रपट करणार आहेस का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. परंतु, अक्षयसोबत काम करणं शक्य नाही असं शाहरुखनं स्पष्ट केलं. ‘अक्षय आणि मी एकत्र काम करणं जवळ जवळ अशक्य आहे. आमच्या वेळा जुळणे शक्य नाही. अक्षय सकाळी फार लवकर उठतो आणि मी त्याच्या विरुद्ध आहे. अक्षय ज्यावेळी झोपून उठतो त्यावेळी मी चित्रीकरण संपवून घरी जाऊन झोपायच्या तयारीत असतो. ‘

बॉलिवूडच्या या दोन्ही सुपरस्टार्सच्या चाहत्यांप्रमाणे शाहरुखचीदेखील अक्कीसोबत काम करण्याची इच्छा आहे. खुद्द शाहरुखने हे कबूल केलंय. ‘मला अक्षयसोबत काम करण्याची इच्छा आहे, पण कामांच्या वेळांमुळे ते शक्य होईल असं दिसत नाही’ असंही तो म्हणाला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत