यवतमाळ-वाशीम मतदारसंघात १०२ वर्षीय आजोबांनी केले मतदान

अकोला : रायगड माझा ऑनलाईन

यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील राळेगाव येथील १०२ वर्षीय आजोबांनी प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अनोखा विक्रम रचला. पुखराज उमीचंद बोथरा असे त्यांचे नाव आहे. त्यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क बजावला. या वयातही ते आपले राष्ट्रीय कर्तव्य निष्ठेने पार पाडत असल्याबद्दल प्रशासनाने त्यांचा गौरव केला.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील राळेगाव येथील २१४ मतदान केंद्रावर पुखराज उमीचंद बोथरा यांचे मतदान विशेष आकर्षण ठरले. स्वतंत्र भारताच्या १९५१-५२ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून आजपर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकीत पुखराज बोथरा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानात मोठय़ा हिरिरीने त्यांनी मतदान केले. मतदानासाठीचा त्यांचा उत्साह एखाद्या तरुणालाही लाजवेल, असा होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत