रशियाचा सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन

Related image

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. रशियाने ट्वीट करून हा निर्णय जाहीर केला. रशियाने दिलेला हा पुरस्कार ही जागतिक राजकीय घडामोडींमध्ये मोठी बातमी असल्याचं मानलं जात आहे. एकाच वेळी रशिया आणि अमेरिका दोन्ही देशांबरोबर भारताचे राजनैतिक संबंध दृढ होत असल्याचं हे लक्षण मानलं जात आहे. मोदींनी स्वतः केलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय दौऱ्यांनंतर आता ही बातमी येत आहे.

ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यूज द अपोजल नावाने हा पुरस्कार रशियातला सर्वोच्च नागरी सन्मान समजला जातो. तो भारताच्या पंतप्रधानांना जाहीर झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत