‘राज्यात मुलं पळवणारी टोळी सक्रिय’: आव्हाडांच मजेशीर ट्विट

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Image result for jitendra awhad

महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला जोरदार झटका बसला आहे. सुजय विखे हे भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले असून ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
‘महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रीय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीमधील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी’, असं मजेशीर आणि भाजपला चिमटा काढणारं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. हे ट्विट करताना आव्हाड यांनी भाजपचे किंवा सुजय-विखे पाटील यांच्या नावाचा कोणताही उल्लेख केला नसला तरी सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर हे ट्विट करण्यात आल्याने त्याचा संबंध जोडला जात आहे.

या ट्विट आधी त्यांनी आणखी एक ट्विट करून आप-आपसातले वाद तुम्हाला कसे संपवू शकतात, याचे उत्तम वास्तविक उदाहरण, असे म्हणत एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत दोन प्राणी भांडताना दिसत असून पाठीमागून वाघ येतो व एकाची शिकार करतो, हे या व्हिडिओत दिसत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत