रायगड माझाच्या पाठपुराव्याला यश; दास कंपनीला माती पुरवणाऱ्यां ठेकेदाराला साडेचार कोटी दंड भरण्याची नोटीस

म्हसळा : निकेश कोकचा 

म्हसळा तालुक्यातील रोहिणी खाडीत कार्यरत असणाऱ्या दास ऑफशोर कंपनीला बेकायदारित्या माती पुरवणाऱ्या ठेकेदाराला म्हसळा तहसिल कार्यालयातर्फ साडेचार कोटी रुपयांचा दंड ठोटावला असल्याची नोटीस बजावण्यात आली आहे. रायगड माझाने  ५ मे रोजी दास कंपनीचा महसुल विभागाला गंडा नावाने प्रसिद्ध  केलेल्या बातमीमुळे म्हसळा तहसिलदारांना आपल्या कर्तव्याची जाणीव होताच सदर कारवाई करण्यात आली.
रोहिणी गावामध्ये २००७ /०८ मध्ये शासनाचे नियम पायदळी तुडवत दास ऑफशोर कंपनीने आपले काम सुरु केले. दास कंपनीचे काम सुरु करण्यासाठी लाखो कांदलवन झाडांची कत्तल करूण खाडीमध्ये भराव टाकण्यात आला. दास कंपनीच्या मालकाने खाडीमध्ये टाकण्यात आलेल्या भरावासाठी महसुल विभागातील मोठया अधिकाऱ्यांना गळाशी लाऊन हजार ब्रास परवाणगी मागे लोखो ब्रास मातीचे उत्खनन करुण दास ऑफशोर कंपनी उभी केली आहे. मात्र दास कंपनीने शासनाच्या परवाणगी पेक्षा किमान दिड लाख ब्रास मातीचे जास्त उत्खनन व भराव करुण शासनाला ४० कोटी रुपयांचा गंडा घातला असताना, फक्त साडेचार कोटी रुपयांची म्हसळा महसुल विभागाने काढलेली नोटीसची कारवाई आर्थिक संशयाच्या भौऱ्यात येताना दिसत आहे.
नेहमीच सामन्य शेतकरी व नागरीकांना आपल्या एका कामासाठी वारंवार तहसिल कार्यालयाचे चक्कर मारण्यासाठी भाग पाडणाऱ्या सर्कल, तहसिलदार  यांनी दास ऑफशोर कंपनीने शासनाचे सर्वच नियम पायदळी तुडवत कंपनी उभारत महसुल विभागाला कोठयावधीचा गंडा घालत असताना कारवाई का केली नाही ?असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. या  कंपनीमध्ये बेकायदेशीर कामानां पाठीशी घालून शासनाचा कोठयावधी रुपयांचा महसुल बुडवण्यात भागीदार असणाऱ्या सर्कल, तहसिलदार   यांच्यावर निलंबनाची कारवाई करुण त्याची चौकशी  करण्याची मागणी म्हसळा तालुक्यातील नागरिक करीत आहेत.
दास ऑफशोर कडून खाडीत घडवला जातो स्फोट :
दास ऑफशोर कंपनी कडून अथवा त्यांच्या ठेकेदाराकडून रोहिणी खाडीत बेकायदेशीर रित्या क्रशर सुरु करण्यात आला आहे. या क्रशरसाठी लागणाऱ्या खडीसाठी रोहिणी खाडी परिसरात नियमीत स्फोट घडवण्यात येत असतो. सदर क्रशरची अधिकृत माहिती तहसिल कार्यालयात उपलब्ध नसताना हा क्रशर सुरु कसा झाला. या क्रशर व त्याच्यासाठी होणाऱ्या स्फोटामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. दास ऑफशोर कंपनीचा मालिक व त्याचा भाऊ  हा राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांच्यावर कारवाई करता येत नसल्याची घुसफुस महसुल विभागात ऐकावयास मिळत आहे.
बॅक गॅरंटीचे पैशे स्वताच्याच खात्यात ?
२०१३ / १४ ला  पर्यावरणाला धोका निर्माण केल्याप्रकरणी हरित लवादा न्यायालयाने  दास ऑफशोर कंपनीला २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र कंपनीमालकाने युक्तीवाद दाखवत  दंड न भरता साडेबारा कोटी रुपयांची बॅक गॅरंटी दिली. या बॅक ग़ॅरेंटीसाठी कंपनीमालकाने दंडाचे पैशे स्वताच्या खात्यात ठेऊन कोर्टाची देखील फसवणूक केली असून  त्याचा व्याजदेखील तोच स्वता खात असल्याची चर्चा म्हसळा शहरात सध्या सुरु आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत