‘रायगड माझा’च्या बातमी शासन दरबारी दखल; भीमा नदी मध्ये ७००० क्युसेसने पाणी सोडले

इंदापूर : विजय शिंदें

भीमा नदीत पाणी सोडण्याबाबाताचे वृत्त रायगड माझाने काही दिवसांपूर्वी प्रसारित केले होते. ‘रायगड माझा’च्या या वृत्ताची शासन दरबारी दखल घेतली गेली असून अखेर भीमा नदीवर असणाऱ्या भाट निमगाव बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे.

पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने हिंगणगाव येथे भूमिपुत्र संघटनाने काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्यानंतर राज्यांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील भाटनिमगाव बंधाऱ्याची पाहणी केली होती. भाटनिमगाव बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन कार्यकारी अभियंता यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. अखेर हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकाराने आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भीमा नदीला पाणी सोडण्यात आले आहे. यामूळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील औज येथील बंधारा कोरडा पडल्याने सोलापूर शहरात पाणी समस्या निर्माण झाली होती. शेतकऱ्यांच्या पाणी समस्येबाबत आवाज उटवल्याने शेतकऱ्यांनी ‘रायगड माझा’चे आभार मानले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत