राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपद सोडणार

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत ते आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. पराभवावर मंथन करण्यासाठी बोलावलेल्या काँग्रेसच्या याआधीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत त्यांनी आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, पक्षाच्या कार्यकारिणी समितीने तो फेटाळला.

काँग्रेस अध्यक्ष पदावर राहुल गांधी कायम राहणार की नाहीत, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. याच दरम्यान, आज, बुधवारी ए. के. अँटनी यांच्या अध्यक्षतेखाली कोअर गटाची बैठक होत आहे. यात आगामी संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरविली जाणार आहे. तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड आणि राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा होणार असल्याचे समजते.

दरम्यान, राहुल गांधी काही दिवसांसाठी परदेशात जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. याच दरम्यान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होत आहे. यात पदाधिकाऱ्यांच्या बदलावर चर्चा होणार आहे. काँग्रेस पक्षातर्गंत १९९९ पासून कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत