रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्यरेल्वे ची वाहतूक विस्कळीत

ठाणे : रायगड माझा वृत्त

सकाळी ८ च्या सुमारास कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने मुंबईकडे येणाऱ्या सर्व लोकल्स डोंबिवलीतच थांबवण्यात आल्या. ऐन गर्दीच्यावेळी सुमारे २० ते २५ मिनिटे गाड्या ऐकाच ठिकाणी थांबल्याने कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाल्याने दिवा, ठाणे, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आदी रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांनी त्यांचा मोर्चा खासगी वाहनांकडे वळवला.

ऐन गर्दीच्यावेळी कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने डोंबिवलीहून सीएसएमटीकडे येणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. कोपर स्थानकाजवळ रेल्वे गाड्या थांबल्याने या मार्गावरील वाहतूक २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांचे हाल झाले.

दरम्यान, रेल्वे रुळाला तडा गेल्याचं लक्षात आल्यानंतर रेल्वेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचं काम सुरू केलं आहे. दरम्यान, अप धीम्यामार्गावरून ही वाहतूक धीम्या गतीनं सुरू झाल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत