लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा

पुणे : रायगड माझा वृत्त 

‘सांस्कृतिक कट्टा’ या पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या उपक्रमांतर्गत काल लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्याशी संभाषणाचे आयोजन करण्यात आले होते.या चर्चेत सुरेखा पुणेकरांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.’लावणी अमेरिकेत जाऊ शकते, तर मी विधानसभेत जाऊन लोककलावंतांचे प्रश्‍न का मांडू शकत नाही?’,असा सवाल सुरखा पुणेकरांनी केला आणि ‘मी मोहोळ किंवा पुणे शहरातील मतदारसंघातून राजकीय पक्षाकडून निवडणूक लढविण्यास तयार आहे,’ असे त्यांनी जाहीर केले.

‘बदलता काळ आणि नवमाध्यमांमुळे विविध कला प्रकारांमध्ये बदल होत आहे.तसेच लावणीचे स्वरूप देखील बदलत आहे.बदल केले नाहीत, तर लावणी कालबाह्य होईल,’ यावर सुरेखा ताईंनी लक्ष वेधले होते.तसेच ‘मी लावणीचे अस्तित्व कायम राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लावणीचे योग्य प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी लावणी अकादमी सुरू करणार आहे. व्यासपीठावरून बोलण्यापासून ते लावणी सादर करण्यापर्यंतचे प्रशिक्षण दिले जाईल. लोककला, पाश्‍चात्त्य नृत्याचा सहभाग वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. लोकांच्या आवडीप्रमाणे आपली कलाही बदलायला हवी,’ असे पुणेकर म्हणाल्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत