लोकसभा निवडणुकीसाठी श्रीरंग बारणे यांची प्रचारासाठी नवीन शक्कल

खासदार बारणे यांचा महात्मा उद्यानात मॉर्निंग वॉक

पिंपरी : रायगड माझा वृत्त
‘उमेदवार एकच हिताचा – सर्वांच्या प्रगतीचा, श्रीरंग अप्पांना निवडूया – हक्क बजावू मताचा’ असे म्हणत वासुदेवांनी शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराची कवणे गायली. रविवारी काळेवाडी येथील महात्मा उद्यान येथून या अनोख्या प्रचाराला सुरुवात झाली.
महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी काळेवाडी येथील महात्मा उद्यानात मॉर्निंग वॉक केला. यावेळी वासुदेवांनी कवणे गाऊन अनोख्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, हरेश नखाते, प्रदीप दळवी, प्रमोद ताम्हणकर, अंकुश कोळेकर, भरत जाधव, हनुमंत पिसाळ, हनुमंत सुतार, गणेश वायबल, राजू खांदवे, भाग्यश्री म्हस्के, उज्वला पांढरे, कल्पना काकूर्डे आदी उपस्थित होते.
रविवारी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी महात्मा उद्यानात मॉर्निंग वॉक केला. यावेळी त्यांनी उद्यानात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांशी चर्चा केली. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी खासदार बारणे यांच्या प्रचारासाठी अनोखे पथक दाखल झाले. वासुदेवाच्या या पथकाने खासदार बारणे यांनी केलेल्या कामांची कवणे गायली. मावळ लोकसभा मतदारसंघात बारणे यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत श्रीरंग बारणे हेच योग्य उमेदवार असल्याचे वासुदेवांनी आपल्या कवणात सांगितले.
‘श्रीरंग अप्पांना निवडूया – हक्क बजावू मताचा, सामान्य माणसाचा व्हावा विकास – यासाठी आहे हा सारा अट्टाहास, वचनांची करणार पूर्तता खास – तडजोड नाही या निर्णयास, वासुदेव हा मतदाराला – मत मागाया दारात आला’ अशा प्रकारची कवणे गात वासुदेवांनी खासदार बारणे यांचा प्रचार केला.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत