वादळात कागद उडल्याने शेततळ्याचे मोठे नुकसान

अहमदनगर: रायगड माझा वृत्त 
बोटा परिसरातील समीर दत्तात्रय डुंबरे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रातील शेततळ्याजवळ लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये अत्यंत कमी वेळात मोठ्या प्रमाणात वादळ आल्याने कागद फाटल्याचे दृश्य कैद झाले आहे. मान्सूनपूर्व पावसाने सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी संगमनेर तालुक्यात हजेरी लावली. अत्यंत कमी वेळात मोठ्या प्रमाणात वादळ आल्याने केवळ पंधरा मिनिटात मोठे नुकसान झाले.

पठारभागातील बोटा, घारगाव, साकुर, पिंपळगावदेपा, खंडेरायावाडी, सरोळेपठार, अकलापूर, आंबी दुमाला, आंबी खालसा या परिसरात वादळात शेततळ्यांचे कागद उडून सुमारे ५० ते ६० शेततळ्याचे कागद फाटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. कृषी विभागाने पाहणी करून दुरुस्तीसाठी मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत