वॉर्डबॉयनेच डॉक्टर असल्याचे सांगून गर्भवती महिलेवर केले उपचार

पुणे: रायगड माझा वृत्त

वडगाव शेरी परिसरातील अनुप हॉस्पिटल येथील वॉर्डबॉयनेच डॉक्टर असल्याचे सांगून गर्भवती महिलेवर उपचार केले. परंतु, महिलेला जास्ता रक्तस्राव झाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. नऊ जून रोजी रात्री अचानक त्यांच्या पत्नीच्या पोटात दुखत असल्याने त्यांनी वडगाव शेरी येथील अनुप रुग्णालयात त्यांना दाखल केले. या ठिकाणी एक व्यक्ती डॉक्टरच्या वेशात होती.  या घटनेत बाळाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे त्याची प्रकृती नाजूक झाली. तीन दिवसांच्या उपचारानंतर बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी त्या व्यक्तीला तुम्ही डॉक्टर का, अशी विचारणी करून पत्नीच्या पोटात दुखत असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने आपण डॉक्टर असल्याचे सांगून महिलेचा रक्तदाब तपासला. तो वाढल्याचे दिसले. त्या वेळी त्याने मोबाइलवरून कोणाला तरी फोनवर ही माहिती दिली. त्यानंतर मिळालेल्या सूचनांनुसार त्याने महिलेला तपासले.  याबाबत वडगाव शेरी येथील एका व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार हरी शंकर ठाकूर (वय ३६, रा. वडगाव शेरी)आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात ही घटना घडली असून धक्क्यातून सावरल्यानंतर त्यांनी ही तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांची पत्नी आठ महिन्यांची गर्भवती होती.

रात्री एकच्या सुमारास तक्रारदार पत्नीला घेऊन त्या ठिकाणी गेले. त्या वेळी तेथील डॉक्टरांना माहिती देऊन तो ‘डॉक्टर’ निघून गेला. यानंतर दुसऱ्या रुग्णालयातील डॉक्टरने तक्रारदार यांना बाळाची प्रकृती नाजूक असून त्याला काचेच्या पेटीत ठेवावे लागेल, त्यासाठी जास्त खर्च होऊ शकतो, अशी माहिती दिली. तक्रारदार यांना जास्त खर्च परवडणार नसल्यामुळे त्या डॉक्टरने त्यांना कमांड हॉस्पिटलमध्ये पत्नीला दाखल करण्यास सांगितले.  तपासणी केल्यानंतर महिला जोराने ओरडू लागली. त्या वेळी पत्नीने रक्तस्राव होत असल्याचे सांगितले. तरीदेखील ‘डॉक्टर’ने त्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळाने परत रक्तस्राव होत असल्याची माहिती दिली. या वेळी त्याने दोन गोळ्या घेण्यास सांगितले. एक गोळी महिलेने घेतली. मात्र, काही वेळातच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. त्या वेळी तो ‘डॉक्टर’ खूपच घाबरला. त्याने त्यांना तत्काळ दुसऱ्या रुग्णालयातील एका डॉक्टरांना फोन करून याची माहिती दिली. तसेच, महिलेला त्या ठिकाणी घेऊन जाण्यास पतीला सांगितले. अशा अवस्थेत तक्रारदार यांनी पत्नीला पहाटे तीन वाजता कमांड हॉस्पिटलला दाखल केले.

महिलेची परिस्थिती पाहून तेथील डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले. मात्र, रक्तस्राव जास्त झाल्याने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु, बाळाची प्रकृती नाजूक झाली होती. तीन दिवसांनी बाळाचा मृत्यू झाला, असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार यांनी पहिल्यांदा दाखल केलेल्या हॉस्पिटलमधील डॉक्टरची माहिती घेतली. त्या वेळी उपचार करणारी व्यक्ती डॉक्टर नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी तक्रार दिली असून चंदननगर पोलिस अधिक तपास करत आहेत.  तक्रारदार यांचा विवाह २०११ झाला आहे. परंतु, त्यांना मूलबाळ होत नव्हते. अनेक ठिकाणी उपचार घेतले. त्यानंतर त्यांची पत्नी गर्भवती राहिली होती. अचानक पोटात दुखत असल्याने त्यांना तातडीने पतीने रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टर नसताना वॉर्डबॉने केलेल्या उपचारांनंतर रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या पत्नीला धक्का बसला असून पत्नीचीही प्रकृती नाजूक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत