व्हिडीओ पाहून प्रसूती करण्याचा प्रयत्न करताना तरुणी आणि नवजात अर्भकाचाही मृत्यू

गोरखपूर : रायगड माझा वृत्त 

Image result for pregnant women
ऑनलाइन व्हिडिओ पाहून स्वतःच प्रसूती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २५ वर्षीय गरोदर तरुणीसह नवजात अर्भकाचाही मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे ही घटना घडली. तिच्या खोलीत पोलिसांना एक फोन सापडला. त्यात प्रसूतीचा व्हिडिओ सुरू होता, असं सांगण्यात येतं.

तरुणी मूळची बहराइचची राहणारी होती. गेल्या चार वर्षांपासून ती गोरखपूरमध्ये राहत होती. चार दिवसांपूर्वी तिने बिलंदपूर परिसरात एक खोली भाड्याने घेतली होती. रविवारी शेजाऱ्यांनी तिच्या खोलीच्या बाहेर रक्त वाहताना पाहिलं. याबाबत त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले. तरुणी आणि नवजात बालक रक्ताच्या थारोळ्यात खोलीत पडले होते. तरुणीचा मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तरुणी अविवाहित होती. चार दिवसांपूर्वीच ती येथे राहायला आली होती. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला नाही. कारण तिच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दिली नाही. ती कुणापासून गरोदर राहिली? त्या व्यक्तीविषयी तिच्या कुटुंबीयांनी माहिती दिली नाही, असं पोलीसांनी सांगितलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत