शत्रुघ्न सिन्हांची भाजपाचा हात सोडून राहुल गांधींना साथ!

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त

शत्रुघ्न सिन्हांनी सोडला भाजपचा हात, आता देणार राहुल गांधींना साथ!

भारतीय जनता पक्षाचे बंडखोर नेते आणि खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सिन्हा यांनी आज काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. 6 एप्रिलला त्यांची औपचारिक घोषणा होणार आहे.

भाजपने पटनासाहिब इथून शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली नाही त्यामुळे ते नाराज होते. यामुळेच त्यांनी भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि इतर पक्षांची मोट बांधून महागठबंधनला एकत्र ठेवण्यात शत्रुघ्न सिन्हा यांची महत्त्वाची भूमिका आहे, असं बोललं जातं. त्यांच्या या कामाची पावती म्हणूनच पटना साहिबमधून त्यांना उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री असलेले ‘बिहारी बाबू’ रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात ते निवडणूक लढवू शकतात. अलीकडेच शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सोडण्याचे संकेत दिले होते. त्यांनी ट्विटरवर, ‘मोहब्बत करनेनाले कम न होंगे, (शायद) तेरी महफिल में लेकिन हम न होंगे’ असं ट्विट केलं होतं. यानंतर त्यांनी बरेच ट्विट केले होते आणि ‘इशारों इशारों मे’ भाजपला सूचितही केलं होतं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत