शाळेचा पहिला दिवस पर्यावरणासाठी सेन्ट जोसेफ शाळेचा अभिनव उपक्रम

पनवेल : साहिल रेळेकर 

उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर शाळेचा पहिली दिवस.प्री नर्सरी आणि नर्सरी शाळा आजपासून सुरू झाल्या. यामुळे छोट्या शाळकरी मुलांची आज लगबग पाहायला मिळाली.एक सारखे रंगीत गणवेश,एकसारखे बुट यामुळे बच्चे कंपनी कमालीची खुश होती, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवा डबा, नवे दप्तर, वह्य़ा पुस्तकांच्या नवलाई बरोबरच मित्रांना भेटण्याची उत्सुकता होती.त्यातच काही चिमुरड्यांचा उतरलेला चेहरा आणि खाऊचे अमिष आणि ईतर आजूबाजूच्य गोष्टी सांगत पालकांनी आपल्या चिमुरडय़ांना शाळेत सोडून मागे मागे वळत काढता पाय घेत पालकही बोझड मनाने कामाला जात होते.

परिसरातील ज्या शाळा भरल्या होत्या त्या शाळांमध्ये असेच काहीसे वातावरण पहायला भेटत होते. नवीन पनवेल मधील सेंट जोसेफ स्कूल मध्ये ही आज काहीसे असेच वातावरण होते. शाळेचा हा पहिला दिवस या लहान मुलांच्या कायमस्वरूपी लक्षात रहावा यासाठी नवीन पनवेलच्या सेन्ट जोसेफ शाळेने आगळा वेगळा उपक्रम राबवला. आज सकाळी शाळेत आलेल्या छोट्या विद्यार्थ्यांना शाळेच्या गार्डनमध्ये नेण्यात आले. तिथे या प्रत्येक छोट्या विद्यार्थ्याने झाडांना पाणी घातले आणि पर्यावरणाचा आनंद घेत शाळेचा पहिला दिवस पर्यावरणाच्या सानिध्यात घालवला.यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. शाळेने या विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या सान्निध्यात नेऊन शाळेच्या पाहिल्या दिवसाची सुरुवात केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत