शिमल्यात बर्फवृष्टी, रेल्वेमंत्र्यांकडून टॉय ट्रेनमधील व्हिडीओ ट्वीट

शिमला : रायगड माझा वृत्त 
Related image

शिमल्यातली कालका टॉय ट्रेन ही सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बिंदू ठरली आहे. ज्या परिसरातून ही टॉय ट्रेन जाते, तिथे बर्फवृष्टी झाल्यानंतर अतिशय सुंदर नजारा दिसतो.. या निसर्ग सौदर्यांचा व्हिडीओ रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट केला आहे. जम्मू काश्मीर आणि हिमाचलप्रदेशमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे.

हिवाळा हा सर्वांचाच आवडता ऋतू आहे. हिवाळ्यात अनेक पर्यटक फिरायला जातात.आणि जिथे बर्फवृष्टी असते ती पर्यटकांसाठी पर्वणीच असते.सध्या कालका शिमला टॉय ट्रेन पर्यटनासाठी मोठं आकर्षण ठरतंय. त्यामुळे निसर्गाचं हे नयनरम्य रूप आपल्याला अनुभवायला मिळत आहे. ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्व पर्यटकांचं भान हरपून गेलंय. ट्रेनच्या दोन्ही बाजूला बर्फाची चादर पसरलेली दिसतीये.त्यामुळे शिमल्यामध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत