शेतकऱ्यांनी आत्महत्यांचा विचार करु नये: कृषीमंत्री अनिल बोंडे

रायगड माझा वृत्त 

राज्यात सध्या कृषी संकट निर्माण झाले आहे ही खरी बाब आहे. त्यावर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १९,००० कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पीक कर्जमाफीपेक्षा महाराष्ट्रात पीक कर्जमाफीची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे नवनियुक्त कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी दिली आहे.

दरम्यान, येत्या काही आठवड्यांत उर्वरीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करु नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. मात्र, उर्वरीत शेतकऱ्यांना येत्या काही आठवड्यांमध्ये कर्जमाफीचा फायदा मिळेल असे आश्वासन त्यांनी यावेळी देले. बोंडे म्हणाले, मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी आत्महत्येचे विचार मनातून काढून टाकावेत. सध्याचा काळ कसोटीचा आहे कारण, अद्याप राज्यात पावसाने हजेरी लावलेली नाही.

या परिस्थितीशी आपल्या सर्वांना लढा द्यायचा आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी चांगले काम करीत आहे. काँग्रेसचे सरकार असलेल्या आणि मोठा गाजावाजा झालेल्या राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीपेक्षा आपल्याकडे कर्जमाफीची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे, अशा राजकीय शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत