शॉर्ट सर्किट झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

रायगड माझा वृत्त

मुलुंड रेल्वे स्थानकात शॉर्ट सर्किच झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शुक्रवारी दुपारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.

गुरूवारी संध्याकाळीही ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.  सलग पाचव्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुंलुंड स्थानकात शॉर्ट सर्किट झाल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

त्यानंतर जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून वळवण्यात आली होती. तसेच मंगळवारी सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या मुंबईतील प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला. मध्य रेल्वेवर सीएसटीएमकडे येणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने सुरु होता. दरम्यान, उद्घोषणाही करण्यात येत नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. सलग पाचव्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मध्य रेल्वेच्या कारभाराबाबत प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत