श्रीलंका बॉम्ब हल्ला प्रकरणी तामिळनाडूत संशयितांच्या घरावर एनआयएचा छापा

NIA Raids 7 Locations in Tamil Nadu Over Suspected Link Between Coimbatore's IS Module, Sri Lanka Easter Attack | तामिळनाडूत NIA ची छापेमारी; श्रीलंका बॉम्बस्फोट कनेक्शन?

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त

श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने तमिळनाडूतील तीन संशयितांच्या घरावर छापा टाकला आहे.आज सकाळी सहा वाजता कोच्चीहून एनआयएचे अधिकारी कोयंबत्तूरला पोहोचले. त्यानंतर ठिकठिकाणी छापेमारी केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पोथनूरमध्ये अझरुद्दीन उक्कदम, सद्दाम, अकबर यांच्यासह कुणियामथूरमध्ये अबुबकर सिद्दीक आणि अल अमीम कॉलोनीत इधियाथुल्ला यांच्या घरावर छापा टाकला असून चौकशी सुरु आहे.

श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर भारत आणि श्रीलंकने पाच संशयितांचे फोन नंबर शेअर करण्यात आले होते.या संशयितांचा संबंध ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेशी असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताने सुद्धा काही अशा लोकांचे नंबर शेअर केले होते, जे श्रीलंकेतील दोन फिदायिनांच्या कुटुंबियांच्या संपर्कात होते. दरम्यान, एनआयएची टीम काही दिवसांपूर्वी आयएसच्या संशयितांची माहिती घेण्यासाठी श्रीलंकेला गेली होती. या माहितीच्या आधारावर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आज कोयंबत्तूरमध्ये छापेमारी केली असून यासंबंधी तपास सुरु केला आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत