सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वे ची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेचं वेळापत्रक पुन्हा कोलमडलं; आज तर म्हणे.....

ठाणे : रायगड माझा वृत्त

पहाटेच्या सुमारास खर्डीजवळ इंजिन बंद पडल्यानं आज सकाळपासूनच मध्य रेल्वेचं वेळापत्रक पुन्हा कोलमडलंय. सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचं वेळापत्रकाचे तीन तेरा वाजल्यानं प्रवासी संतप्त झाले आहेत. गेली कित्येक वर्षं या टोमण्यांना प्रतिसाद आणि प्रवाशांच्या प्रश्नांना उत्तरं काही मिळालीच नाहीत. मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच सरीत मध्य रेल्वे रखडली, खोळंबली. सोमवारी रात्री कोपर स्थानकावर पेंटाग्रामफमधून ठिणग्या उडाल्या आणि मध्य रेल्वे पुरती गडबडली. मध्य रेल्वेची ही रखडमपट्टी मंगळवार सकाळपर्यंत कायम होती…

सततच्या खोळंब्याला कंटाळून प्रवासी संघटनांनी मध्यरेल्वेच्या डीआरएमला मंगळवारीच पत्र दिलं होतं. मात्र, आज पुन्हा एकदा मध्य रेल्वे खोळंबली. त्यामुळे आता प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट होईपर्यंत प्रशासन वाट बघणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.  मुंबईत पहिला पाऊस येतानाच दोन बातम्या घेऊन येतो. एक म्हणजे पाऊस आला ही बातमी आणि दुसऱी म्हणजे पहिल्याच पावसात मध्य रेल्वेची वाट लागली, ही दुसरी बातमी.गेल्या काही दिवसांत तर मध्य रेल्वेनं रखडमपट्टीचा कहर केला आहे.

 

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत