बनावट कॉल सेन्टर चालवून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नवी मुंबई पोलिसांना मोठ यश

पनवेल : साहिल रेळेकर

सायबर क्राईमच्या सराईत रॅकेटचा पर्दाफाश करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलं आहे. बनावट कॉल सेन्टर चालवून लोकांना कर्ज मंजूर झाल्याचा बहाणा करून व विमा उतरवून पॉलिसी काढून देण्याचे सांगून लाखो रुपये उकाळणाऱ्या रॅकेटला सायबर गुन्हे शाखा नवी मुंबई कडून अटक करण्यात आली आहे.

बनावट कॉल सेंटर चालवून लोकांना फोन करून कर्ज मंजुरीचा बहाणा करून व विमा पॉलिसी काढण्याचे सांगितले जात असल्याचे तपासादरम्यान समोर आले. भांडुप येथील ‘ड्रीम्स मॉल’ येथून हे कॉल सेंटर चालवलं जात होतं. ड्रीम्स मॉल भांडुप पश्चिम (मुंबई) येथे पडताळणी करून पोलिसांनी पाळत ठेवली असता तेथे “अल्ट्रा मॅनेजमेंट सर्व्हिसेस” नावाचे बनावट कॉल सेन्टर चालवून लोकांना बजाज अलायंझ विमा कंपनी, रिलायन्स सर्व्हिसेस व इतर लोन देणाऱ्या तसेच विमा देणाऱ्या कंपन्यांच्या नावाशी मिळते जुळते खाते तयार करून गरजू कस्टमरची माहिती प्राप्त करून त्यांना कॉल करून कर्ज काढुन देतो, बंद पडलेले विमा सुरू करून देतो असा बहाणा करून पैसे दिल्ली, नोयडा, गाझियाबाद येथील बँक खात्यात भरण्यास सांगत होते. त्यानंतर खात्यात पैसे भरताच ते इतर आरोपींच्या मदतीने वैयक्तिक बँक खात्यात प्राप्त करून फिर्यादी व साक्षीदार तसेच इतर अनेकांची फसवणूक करीत असल्याचे तपासात आढळून आले.
या कारवाईत आरोपी असलेली मुले साधारणतः 25 ते 30 वर्ष वयोगटातील तरुण मुले आहेत. या टोळीकडून 3 लपटॉप्स, 20 मोबाईल फोन, 1 कॉम्पुटर, व 30,000/ असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत