सावरोली गणेश मंदिरात जन्म उत्सव सोहळा संपन्न, तर सातवा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा

खोपोली : समाधान दिसले

तरुणाईला पोषक असणारे भारतीय संस्कृतीचे विचार टीव्हीही चॅनल वरून प्रकाशित झाले पाहिजेत – ह भ.प. हरिदास महाराज पालवे 

खालापूर तालुक्यातील सावरोली येथील श्रीगणेश सांस्कृतिक शिक्षण व क्रीडा मंडळाच्या पुढाकारातून 1998 पासून तरुणाईमध्ये एकोपा निर्माण व्हावा यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव सोहळा सुरु करून विविध कार्यक्रम राबवीत असताना जुन्या जाणत्या मंडळीच्या मनामध्ये गणेश मंदीर उभारण्याची संकल्पना आल्याने सावरोली येथे 26 जानेवारी 2012 ला मंडळाच्या कार्यकर्त्यानी लोक वर्गणीतून भव्य मंदिराची उभारणी करून मंदिराचे जिर्णोध्दार केले. या गणेशाच्या जन्म उत्सवानिमित्त सातवा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी साजरा करण्यात आला. यावेळी जन्म उत्सवानिमित्त ह भ.प. हरिदास महाराज पालवे यांनी उत्सव संस्कृती भारतातच आहे इतर ठिकाणी नाही असे सांगत भारतीय संस्कृतीचे विचार टीव्ही चॅनल वरून प्रकाशित झाले पाहिजेत असे विचार कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान करताना सांगितले.

सावरोली गणेश मंदिरात शुक्रवारी ह.भ.प काशिनाथ महाराज बैलमारे यांच्या मार्गदर्शनानुसार महिलांनी पहाटे काकड आरती सादर करून खालापूर पंचायत समितीचे सदस्य उत्तम परबलकर यांनी स्वपत्नीक गणेशाचे महाअभिषेक केले. यानंतर गणेश जन्म उत्सवाआधारित ह.भ.प.हरिदास महाराज पालवे यांनी कीर्तनारूपी ज्ञानदान करीत असताना तरुणाई सैराट प्रवृत्ती कडे वळली जाते आहे. त्यामुळे टीव्ही चॅनल वर भारतीय संस्कृतीचे कार्यक्रम सर्वाधिक सादर होणे गरजेचे असल्याचे सांगत जन्मदात्या आईवडीलांची सेवा करा, सुनेने सासू सासऱ्यांची सेवा केल्यास खऱ्या अर्थाने गणपती बाप्पाची सेवा केल्याचा समाधान मिळेल असे सांगत कीर्तनारूपी उपदेश देऊन ज्ञानदान केले.


यानंतर जवळपास तीन हजाराहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यानंतर रात्री ह.भ.प. विशालबुवा रसाळ संगीत भजनाची मैफिलीने साऱ्यांचे मैफिल जमले. या उत्सवानिमित्त हजारो गणेशभक्तासह अनेक मान्यवरांनी  हजेरी लावून दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यासह गावातील तरुणांसह जेष्ट नागरिकांनीही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केल्याने मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र तटकरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

मंदिरासाठी मान्यवरांकडून भरीव मदत.

खालापूर पंचायत समिती सदस्य उत्तमशेट परबलकर यांच्या निधीतून मंदीरासमोर पेव्हर ब्लॉकचे भूमिपूजन करण्यात आले तर माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद बैलमारे यांच्याकडून गणेश मंदिराच्या ग्रीलसाठी एक लाखचा धनादेश दिला असून गावातील शंकर मंदिरासाठी प्रवीण बैलमारे, एम.डी.पाटील यांचे योगदान तसेच हनुमान मंदिरासाठी मदतीचा हात.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत