सीमेन्सच्या लोकलमुले हर्बल मार्गावरील प्रवाशांचा प्रवास चांगला होणार

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मध्य रेल्वेला सध्या तीन बंबार्डियर लोकलची प्रतिक्षा आहे. त्यातील एक लोकल मध्य रेल्वेत दाखल झाली. तर, अन्य दोन लोकल १५ दिवसांत दाखल होण्याची शक्यता आहे. या लोकल ताफ्यात दाखल झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर धावणाऱ्या सीमेन्सच्या तीन लोकल हार्बर मार्गावर वळवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर सध्या ४० लोकल धावत आहेत. त्यातील ३६ लोकल सीमेन्सच्या असून चार लोकल रेट्रोफिटेडच्या आहेत. हार्बर मार्गावर या ४० लोकलच्या दररोज ६१२ फेऱ्या होतात.

पावसाळ्यात रुळांवर पाणी साचल्यानंतर या गाड्या चालवणे अशक्य होते. या गाड्या साचलेल्या पाण्यातून चालवणे अशक्य होत्या. कारशेडमध्ये पुन्हा या गाड्या आणल्यानंतर त्यांची दुरुस्ती करणे कठीण असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मान्सून सुरू होण्यापूर्वी हार्बर मार्गावरील सर्व लोकल सीमेन्सच्या असतील. त्यामुळे हार्बर प्रवाशांचा प्रवास चांगला होईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

जुन्या, कोंदट असलेल्या लोकलबद्दल हार्बरमार्गावरील प्रवाशांच्या तक्रारी असतात. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात हार्बर लोकल मार्गावरील प्रवाशांचा चांगला प्रवास होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वीच हार्बर मार्गावर सर्व सीमेन्सच्या लोकल धावणार आहेत. हार्बर मार्गावर सध्या धावत असलेल्या जुन्या रेट्रोफिटेड लोकल ताफ्यातून बाद होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पावसाळ्यात पाणी साचल्यानंतर जुन्या बनावटीच्या रेट्रोफिटेड लोकलमध्ये बिघाड होतो. परिणामी, लोकल वाहतूक रखडली जाते. हार्बर मार्गावर धावणाऱ्या रेट्रोफिटेड लोकल ह्या डायरेक्ट करंट (डीसी) आधारीत होत्या. हार्बर मार्गावरील विद्युत प्रवाह डीसीतून अल्टरनेट करंट(एसी) केल्यानंतर या रेट्रोफिटेड गाड्यांमध्ये बदल करण्यात आले होते. त्यामानाने सीमेन्स बनावटीच्या लोकल साचलेल्या पाण्यातून धावू शकतात.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत