२ आॅक्टोबरला राहुल गांधी सेवाग्राममध्ये घेणार बैठक

नागपूर : रायगड माझा वृत्त 

अ. भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीला सेवाग्राम येथील बापुकुटीला भेट देणार आहेत. विशेष म्हणजे, याच दिवशी काँग्रेस कार्यसमितीची बैठक सेवाग्राम किंवा नागपुरात घेऊन भाजपा व संघ परिवारालाही एक संदेश देण्याची रणनीती आखण्यात आली असल्याची माहिती आहे.

राहुल गांधी यांच्या या दौऱ्यासाठी प्रदेश काँग्रेस सक्रिय झाली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दौºयाच्या तयारीसाठी नागपूर व वर्धा येथील निवडक पदाधिकाºयांची शनिवारी मुंबई येथे बैठक बोलाविली आहे. भाजपाची कोंडी करण्यासाठी काँग्रेसतर्फे राफेलच्या मुद्द्यावर देशभर धरणे, निदर्शने सुरू आहेत. जनसंघर्ष यात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. राहुल गांधींच्या वर्धा दौºयामुळे कार्यकर्त्यांना बळे मिळेल, असा विश्वास नेतेमंडळींनी वाटत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत